साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून घ्या. तो जळायला नको, नंतर गरम पाण्यात टाकून त्याला अर्धा तास भिजवत ठेवा. एका पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये काळीमिरी, लवंग, बारीक चिरलेली लसूण परतून घ्या. नंतर यात १/२ लिंबाचा रस, मीठ, साखर घालून ३ कप पाणी घालून उकळा. पाणी उकळल्यावर भिजवलेला तांदूळ घालून शिजवा व रायत्याबरोबर किंवा तसाही खायला छान लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भंडारी भातोडे
हा प्रकार विदर्भातल्या भंडारा जिल्ह्य़ात पाहायला मिळतो.
साहित्य : तयार भात ४ वाटय़ा, भरडलेले धणे २ चमचे, जिरे पावडर १ चमचा, जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या ४ ते ५, लसूण-आलं २ चमचे, जाडसर कुटलेली सोप २ चमचे, बारीक चिरलेले कांदे ३ वाटय़ा, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल तळायला, हळद छोटा अर्धा चमचा,
कृती : तांदळाचे पीठ सोडून सर्व जिन्नस एकत्र करा. यानंतर हलक्या हाताने तांदळाच्या पिठीच्या साहाय्याने वडे थापून मंद आचेवर डीप फ्राय करा व दहय़ाच्या चटणीबरोबर खायला द्या.
टीप : वडे तळताना दोनदा तळले तर जास्त खुसखुशीत होतात. जसे वडे झाल्यावर तेलातून अर्धकच्चे काढून घ्या, सव्र्ह करतेवेळी ओल्या हाताने हलकेच दाबून परत तळा. आमचूर घरात नसेल तर त्यात दही, लिंबू, सायट्रिक अॅेसिड घातलं तरी चालू शकेल.
भात कसा शिजवावा?
कुकरमध्ये एकाच भांडय़ात मऊ आणि फडफडीत भात शिजवायचा असेल तर कुकरमध्ये भांडय़ाच्या खाली एक चमचा ठेवा, जेणेकरून ते भांडे कलते होऊन व ज्या भागात पाणी जास्त आहे तो भात मऊ होईल. आणि ज्या भागात पाणी कमी आहे, तो भात फडफडीत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाचे सूप(पेज)
साहित्य : भात शिजवताना थोडे जास्त पाणी घालून त्यावरचे पाणी काढून घ्यावे. (पाणी घट्टसर असावे) तांदळाचं पाणी ५ वाटय़ा, मीठ, साखर चवीनुसार, दही २ चमचे, कोथिंबीर पाव वाटी, फ्रेश क्रीम ४ चमचे, भिजवून तळलेले तांदूळ २ चमचे.
कृती : भातावरचे पाणी उकळायला ठेवून त्यात दही, चवीनुसार मीठ, साखर घालणे, सव्र्ह करते वेळी त्यात वरून फ्रेश क्रीम, तळलेले तांदूळ, कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.
टीप : दही घालण्याआधी घुसळून घ्यावे. तांदूळ तळल्यानंतर त्याला टीपकागदावर टिपून घ्यावे. त्यामुळे सुपावर तेलाचा तवंग दिसणार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply