साहित्य – ८ ब्रेड स्लाईस, १ बटाटा, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरे पूड, १/२ चमचा धने पूड, १/२ चमचा आमचूर पूड, मीठ, तेल.
कृती – बटाटे किसून पाण्यात घाला. पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घाला. ब्रेडच्या कडा कापून टाका. प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवा व लगेच काढून त्यातील पाणी दाबून काढा. आता ब्रेडमध्ये बटाट्याचे मिश्रण घालुन कडा दुमडून त्रिकोणी आकारात बंद करा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ब्रेड तळा. ब्रेड खूप जास्तवेळ पाण्यात बुडवला तर त्याचा लगदा होईल व नीट आकार देता नाही येणार त्यामुळे पटकन पाण्यातून बाहेर काढणे महत्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply