ब्राऊनी म्हणल्यावर आपल्याला सिझलिंग ब्राऊनीच आठवते, पण घरी करून बघा, हे आगळे वेगळे ब्राऊनीचे प्रकार
सिझलिंग ब्राऊनी
एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात आलेली चॉकलेट ब्राऊनी मिळून प्लेट अत्यंत आकर्षक दिसते. चॉकलेट ब्राऊनीवर उकळतं चॉकलेट सॉस सोडण्यात येतं. चॉकलेट सॉस व ब्राऊनी मिळून लाकडाची प्लेट भरून जाते. प्लेटवर उकळी फुटत असल्याचं दिसतं. यानंतर त्यावर चॉकलेट व व्हॅनिला आइस्क्रीमचे दोन मोठे गोळे (स्कूप्स) ठेवण्यात येतात. पुन्हा एकवार चॉकलेट सॉस टाकून त्यावर काजूच्या तुकड्यांचा मोकळा शिडकाव केला जातो. सिझलिंग ब्राऊनी तय्यार. एकाच वेळेस गरम आणि थंड पदार्थाचं कॉम्बिनेशन जिभेवर रेंगाळतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चीज केक ब्राऊनी विथ स्ट्रॉबेरी जाम
साहित्य : १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट, १०० ग्रॅम क्रीम चीज, १०० ग्रॅम स्ट्रॉबेरी जाम.
कृती :- एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, व्हाइट चॉकलेट मीडियमवर ४ ते ५ मिनिटे मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात अंडी साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळुवार मिक्स करून घ्यावे.
हे सर्व मिश्रण एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात टाकावे त्यावरून क्रीम चीज थोडे थोडे ब्राऊनीवर टाकावे व स्ट्रॉबेरी जामचे ड्रॉप ब्राऊनीवर टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावी. थंड झाल्यावर छोटे तुकडे करून सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
होलव्हीट मॅन्गो ब्राऊनी
साहित्य : गव्हाचे पीठ २०० ग्रॅम, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट, ३ अंडी, १ वाटी मॅन्गो पल्प
कृती:- एका काचेच्या बाऊलमध्ये बटर चॉकलेट मायक्रो मीडियम ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात साखर, अंडी फेटून घ्यावे त्यात बटर चॉकलेट मिश्रण मिक्स करून घ्यावे व गव्हाचे पीठ टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे व सर्वात शेवटी मॅन्गो पल्ब टाकून थोडेसे मिक्स करावे पण मॅन्गो पल्ब मिक्स होता कामा नये हे सर्व मिश्रण एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात टाकून कन्व्हेक्शन मायक्रोच्या भांडय़ात टाकून २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply