साहित्य: ३-४ मध्यम गाजरे – साधारण २ कप खिस होईल इतपत, २-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त), ३-४ हिरव्या मिरच्या, १/२ लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर, मुठभर चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, पाणी लागेल तसे.
कृती – गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.
Leave a Reply