साहित्य:-
२ दिल्ली गाजरे, १ बटाटा, पाव कप काबुली चणे, १ पातीचा कांदा, १ तमालपत्र, १ लहान तुकडा आले, १ कप दूध, ७-८ बदाम भिजवून, मीठ, ४-५ मिरे, १ चमचा बटर
कृती:-
भिजवलेले काबुली चणे आधी शिजवून घ्या. कांदा, गाजर, बटाटा बारीक चिरा. लोण्यावर कांदा, तमालपत्र, मिरे, आले परता. त्यात भाज्या, चणे घाला. 1 कप पाणी घालून नरम शिजवा. तमालपत्र काढून मिश्रण मिक्सेरमधून काढा. त्यात दूध, वाटलेले बदाम घाला. मंद गॅसवर उकळा. मीठ व मिरेपूड घाला. थोडे पाणी घाला.
टीप : नेहमीच्या कांद्यापेक्षा पातीचा कांदा सौम्य असतो, म्हणून तो वापरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply