साहित्य: पाव किलो काबुली चणे२ ते ३ कांदे, (किसून)४ ते ५ टोमॅटोचवीपुरता चिंचेचा रसदोन तमालपत्रतीन टेबल स्पून तेलएक टेबल स्पून जिरेदोन चमचे पादेलोण (काळं मीठ)दोन चमचे तिखटअर्धा चमचा गरम मसाला१ टिस्पून आले पेस्ट३ लसूण पाकळ्यांची पेस्ट१ टिस्पून आमचूर पावडर१ टिस्पून धणेपूडपाव चमचा हळदअर्धा चमचा कसूरी मेथीकोथिंबीरएक चमचा आले-लसूण पेस्टचवीनुसार मीठभटूरेमैदा ४ वाट्यारवा अर्धी वाटीदही अर्धी वाटीमीठ चवीनुसारसाखर एक छोटा चमचाबेकिंग सोडा पाऊण चमचातळण्यासाठी तेल.
पाककृती: आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये चणे नरम शिजवून घ्यावेत.जिरे, काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी.तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा. आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे.बारीक चिरलेला टोमॅटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे. कांदा-टोमॅटो एकजीव झाला पाहिजे.त्यात हळद, तिखट, थोडे मीठ, जिरे व काळे मीठ, धनेपूड टाकून परतून घ्यावे. नंतर शिजवलेले चणे टाकावे.चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे. कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .भटुराएका भांड्यात मैदा आणि रवा चाळून घ्यावा.मैद्यात 2 चमचे तेल, मीठ, बेकिंग सोडा, दही आणि साखर घाला.कोमट पाणी घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे.भिजवलेले पीठ 2 तास उबदार जागी झाकून ठेवा.दोन तासांनी कढईत तेल गरम करून घ्या.लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या करून गरम तेलात तळून घ्या.
Leave a Reply