साहित्य:- भिजलेल्या दोन वाटी चवळ्या, एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या, चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ, चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार ), कोथिंबीर बारीक चिरून.
कृती:- चवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे. दोन भांडी पाणी घालून झाकून मध्यम आचेवर दहा मिनिटे शिजू द्यावे. एकीकडे खोबरे, जिरे व सुक्या मिरच्या भाजून वाटून घ्याव्यात. चांगली वाफ आली की झाकण काढून त्यात हा वाटलेला मसाला, लाल तिखट व अर्धी कोथिंबीर घालून पुन्हा पाच-सहा मिनिटे शिजू द्यावे. आता चवळ्या बोटचेप्या झाल्या असतील. त्यात चवीनुसार मीठ, आमसुले व घाटी मसाला व एक भांडे पाणी घालून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply