साहित्य: २५० ग्रॅम उडीद डाळ, १ तुकडा आले,१०० ग्रॅम तूप,१०० ग्रॅम टॉमेटो, २-४ हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ,१/२ लहान चमचा हळद,१/२ लहान चमचा लाल तिखट
कृती: उडीद डाळ चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून शिजवायला गॅसवर ठेवा.
आले-हिरवी मिरची व टॉमेटो बारीक चिरून टाका. मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा ठेवा व पाणी उडीद शिजेल एवढेच टाका. उडीद शिजल्यावर गॅस बंद करा. कढईत तूप टाकून फोडणी टाका. अख्खी लाल सुकलेली मिर्ची व सर्व मसाले टाका व फोडणी शिजलेल्या उडीद मध्ये टाका. तयार वाढताना लिंबू व कोथींबीर टाकून वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply