साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, १ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून, १/२ कप पातळ चिरलेली कोबी, १/२ कप जाडसर किसलेले गाजर, १/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर, १/२ कप दूध, १ टेस्पून मैदा, १/४ कप किसलेले चीज, १/४ टिस्पून काळी मिरपूड, २ टेस्पून बटर, चवीपुरते मिठ, १/२ टिस्पून साखर.
इतर साहित्य: ३ टेस्पून तिखट हिरवी चटणी (कोथिंबीर मिरचीची), टॉमेटो केचप.
कृती: मैदा आणि दूध एकत्र करून ठेवावे. गुठळ्या राहू देउ नयेत. बटर कढईत घेउन त्यात सर्व भाज्या २ मिनिटे मोठ्या आचेवर परताव्यात. मिरपूड, साखर आणि मिठ घालावे. आच कमी करून भाज्यांमध्ये मैदा+दुधाचे मिश्रण घालावे. नीट मिक्स करावे. जरा घट्टसर झाले की चीज घालून मिनिटभर मिक्स करावे. ४ ब्रेड स्लाईसेसवर चटणी लावावी. उरलेल्या ४ स्लाईसेस वर टॉमेटो केचप लावावा. तयार मिश्रण कोमट झाले की त्याचे ४ समान भाग करावे. चटणी लावलेल्या स्लाईसेस वर ठेवावे. वरून टॉमेटो केचप लावलेला ब्रेड ठेवून सॅंडविच तयार करावे. तिरपे कापून दोन त्रिकोणी तुकडे करावे. टॉमेटो केचप आणि हिरवी चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Leave a Reply