साहित्य :
१ किलो चिकन (बोनलेस), २ अंडयातला पांढरा भाग, २ टेबलस्पून वाईन, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा अजिनोमोटो, २ टेबलस्पून सोयासॉस, ४ पातीचे कांदे, १ वाटी तेल, मीठ व साखर चवीनुसार
गार्लिक सॉस बनवण्यासाठीचे साहित्य : १ बारीक चिरलेला लसूण, दिड कप पाणी, १ टेबलस्पून सोयासॉस, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा अजिनोमोटो, अर्धा चमचा मिरपूड, १ टेबलस्पून तेल
कृती:
प्रथम चिकन साफ करून त्याचे बारीक चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यात वर सांगितलेल्या प्रमाणानुसार अंड्यातला पांढरा भाग, वाईन, मीठ, साखर, कॉर्नफ्लोअर, अजिनोमोटो व सोयासॉस एकत्र करावे. नंतर हे मिश्रण चिकनला लावून अर्धा तास बाजूला ठेवावे.
मॅरिनेट झालेले हे चिकनचे तुकडे कढईत तेल गरम करून तळून घ्यावेत. बारीक चिरलेला लसूण तेलावर जरा परतून घ्यावा. नंतर त्यात मीठ, साखर, अजिनोमोटो, मिरपूड व सोयासॉस घालून जरा परतावे. यात १ कप पाणी घालावे. उरलेल्या अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून ते घालावे. हा सॉस जरा वेळ उकळून द्यावा. दाटसर झाला की गॅस बंद करावा. डिशमध्ये चिकन ठेवून त्यावर हा सॉस ओतून गरमागरम सर्व्ह करावे.
Leave a Reply