श्रावणात शाकाहारी पदार्थ खाऊन जिभेची टेस्ट गुळमुळीत झालीये ना!
मग जरा वेगळं ट्राय करा.
चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट
साहित्य : १ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
पेस्तो सॉसची कृती : कोथिंबीर, मिरची, लसूण, पनीर, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा.
फ्रूट चाटसाठीचं साहित्य : १ चमचा चाट मसाला, ४ स्ट्रॉबेरी, पायनॅपल ५० ग्रॅम, एका टोमॅटोचे पिसेस, कांदा आणि त्याच्या पातीचे पिसेस, आणि लिंबाचा रस.
कृती : चिकनच्या पिसेसना लिंबाचा रस आणि मीठ लावून पाच मिनिटं मॅरिनेट करत ठेवावं. नंतर चिकनच्या पिसेसना पेस्तो सॉस लावून ठेवावा. एका पॅनमध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑइल गरम करावं. त्यात पेस्तो सॉस लावलेले चिकनचे पीस घालून परतून घ्यावेत.
चाट कृती : बारीक कापलेले स्ट्रॉबेरी, पायनॅपल, कांदा, त्याच्या पातीचे पिसेस, टोमॅटो आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करावा. वरून चाटमसाला शिवरून एका छोट्या बोलमध्ये र्सव्ह करावेत. सजावटीसाठी थेडी कोथिंबीर वरून पसरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply