साहित्य : सपाट 3 टेबलस्पून कोको, 300 मिलि दूध, 200 ग्रॅम क्रीम, 75 ग्रॅम पिठीसाखर, 1 टेबलस्पून जिलेटिन, 3 अंडी.
कृती : अर्धा कप पाणी व जिलेटिन एकत्र करा. डबल बॉयलरवर विरघळवून घ्या. दूध, साखर, कोको, अंडी वापरून कस्टर्ड बनवा. गार झाल्यावर जिलेटिन घाला. थोडे क्रीम घाला. काचेच्या बाऊलमध्ये सेट करा. वर फेसलेले क्रीम, अक्रोडाचे तुकडे पेरा, किंवा किसलेले चॉकलेट पेरा. तरुण मंडळींचा हा आवडता पदार्थ आहे. पेपरकप किंवा काचेच्या बाउल्समध्येही सेट करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply