साहित्य: 24 कॅनपीज, 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न,1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची, अर्धा कप चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लिंबाचा रस, 1 कप किसून घेतलेले मोझरेला चीज, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, मिरची, सिमला मिरची टाकून एक मिनिट परतावे. नंतर त्यात कॉर्न, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकावं. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं.
हे मिश्रण कॅनपीसमध्ये भरावं. वरून किसलेले चिज टाकावं. पाच मिनिटं 350 डिग्री से.वर बेक करून घ्यावं. पदार्थ तयार.
टीप : तुम्ही ही रेसिपी पाणीपुरीच्या पु:यांमध्ये किंवा मोनॅको बिस्किटामधे पण करू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply