साहित्य – एक साधा लहान सॅन्डविच ब्रेड, एक लहान ब्राऊन सॅन्डविच ब्रेड, अर्धी वाटी कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी, अर्धी वाटी टोमाटो सॉस, काकडी आणि टोमाटोचे पातळ काप, थोडं लोणी, चीजस्प्रेड.
कृती – सहा क्लटब सॅन्डविच बनविण्यासाठी सहा पांढऱ्या ब्रेड स्लाईस आणि तीन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्या. तीन पांढऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी लावावी. तर उरलेल्या तीन पांढऱ्या स्लाईसना टोमाटो सॉस लावावा. प्रथम चटणी लावलेल्या स्लाईस मांडून त्यावर काकडीच्या चकत्या पसराव्या. ब्राऊन ब्रेडच्या स्लाईसला लोणी किंवा चीज स्प्रेड लावून त्यानं झाकावं. त्यावर पुन्हा वरच्या बाजूला लोणी किंवा चीज स्प्रेड लावून त्यावर टोमॅटोच्या चकत्या मांडाव्या आणि त्या टोमॅटो सॉस लावलेल्या पांढऱ्या ब्रेड स्लाईसनं झाकाव्या. अशा रीतीनं प्रत्येकी तीन स्लाईसची चवड तयार होईल. आता ती हलक्याय हातानं दाबून तिरकी कापून त्रिकोणी सॅन्डविच बनवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply