ब्रंट गार्लीक फ्राइड राईस
साहित्य : उकडून घेतलेला तांदूळ १ बाऊल, बारीक चिरलेले गाजर, फरसबी, फ्लॉवर अर्धा वाटी, बारीक चिरलेली कांदापात अर्धा वाटी, तळून घेतलेले चिरलेले लसूण ३ ते ४ चमचे, सोयासॉस अर्धा चमचा, व्हाइट पेपर पावडर १ चिमूट, मीठ चवीनुसार, साखर १ चिमूट, तेल १ ते २ चमचे.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून भाज्या परतून घ्या. नंतर त्यामध्ये सोयासॉस, व्हाइट पेपर पावडर, साखर, मीठ टाकून चांगले टॉस करा. नंतर त्यात उकडलेला भात टाका. असल्यास व्हेजिटेबल सिझनिंग १/२ चमचा टाका. आता कांदापात टाका आणि तळून घेतलेली लसूण टाका. व्यवस्थित एकत्र करून गरमागरम सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
एक्झॉटिक व्हेजिटेबल इन चिली बेसील सॉस
साहित्य : उकडलेले बेबीकॉन कापून घेतलेले ५, उकडलेली ब्रोकोली अर्धा वाटी, उकडलेले गाजर १/२ वाटी, उकडलेले झुकनी अर्धा वाटी, रंगीत सिमला मिरची अर्धा वाटी, उकडलेले फ्लॉवर अर्धा वाटी, उकडलेले मशरुम अर्धा वाटी, बेसील पाने ४ ते ५, सिझनिंग क्युबस् १, बारीक चिरलेले आल लसूण २ ते ३ चमचे, चिरलेली हिरवी मिरची १ चमचा, सोयासॉस २ चमचे, व्हिनेगर अर्धा चमचा, लाल मिरची पेस्ट १ चमचा, व्हाइट पेपर पावडर १/४ चमचा, साखर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, तेल ३ ते ४ चमचे, कॉर्नफ्लोअर ३ ते ४ टी स्पून १ वाटी पाण्यात मिसळवून घेतलेले, पाणी १ वाटी.
कृती : एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची टाकून चांगले परतवून घ्या. नंतर त्यामध्ये पाणी टाकून लाल मिरची पेस्ट, सोयासॉस, व्हिनेगर, व्हाइट पेपर पावडर, मीठ व साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. मिश्रणाला एक उकळी घेऊन त्यामध्ये वरील सर्व भाज्या टाका. नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाका. मिश्रण घट्टसर होईल, आवश्यक वाटल्यास थोडे पाणी टाका. दोन मिनिटे उकळून सेट करून सव्र्ह करा. टिप्स : नुसत्या पाण्याऐवजी उकडलेल्या भाज्यांचे उरलेले पाणी टाकले तरी चालेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चीजी नुडल
साहित्य : नुडल- २०० ग्रॅम, प्रोसेस्ड चीज – २ क्युब, क्रीम- १/४ कप, दही- १/४ कप, उभा चिरलेला कांदा- १ मध्यम आकाराचा, उभा चिरलेली भोपळी मिरची- १ मध्यम आकाराची, बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून, टोमॅटो केचप- सजावटीसाठी.
कृती : मीठ आणि थोडेसे तेल टाकून पाणी उकळत ठेवा. त्यात नुडल्स टाकून शिजवून घ्या. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसून, भोपळी मिरची आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मीठ आणि मिरपूड टाका. नुडल आणि चीज टाकून एकत्र परतून घ्या.
दही आणि क्रीम एकत्र फेटून त्यात घाला व एकत्र करा. कोथिंबीर आणि टोमॅटो केचअपने सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply