साहित्य : 1 कप उकडूून घेतलेले कॉर्न, अर्धा कप शिजवलेला भात, 4 उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप बारीक कापलेली पालक, अर्धा कप बारीक कापलेली कोथिंबीर, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा किसलेले पनीर, 2 ब्रेड स्लाईस, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा
मीरी पावडर, 1 कप ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे. चवीनुसार मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. मिश्रणाचे आवडीनुसार गोल किंवा हार्ट शेप देऊन कबाब तयार करून घ्यावेत. कबाब ब्रेडच्या चु:यात घोळवून तळून घ्यावेत किंवा शॅलो फ्राय करावेत. गरम गरम हिरवी चटणी किंवा टॉमेटो सॉससोबत कबाब खाता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply