साहित्य :- एक कप बेबी कॉर्न, चिमूटभर अजिनोमोटो, मीठ व काळी मिरेपूड चवीनुसार, तळण्यासाठी तेल एक चमचा, प्रत्येकी बारीक चिरलेले आले व लसूण, अर्धा कप टोमॅटो सॉस, सजावटीसाठी कांद्याची पात.
कृती :- प्रथम कांद्याची पात चिरून घ्या. बेबी कॉर्न मिठाच्या पाण्यात 3-4 मिनिटे शिजवून घ्या. पाणी निथळून वेगळे ठेवा. कॉर्नफ्लोअर, मीठ, काळे मिरेपूड व अजिनोमोटो एकत्र करा. यात बेबी कॉर्न मिक्स. करून तळून घ्या. पॅनमध्ये एक चमचा तेलात कांदा, लसूण, आले व मीठ घालून मोठ्या आचेवर परता. टोमॅटो सॉस घाला. मग बेबी कॉर्न घालून परता व गरमागरम सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply