(डाळीसाठी साहित्य) – शिजवलेली तुरीची डाळ, पाणी, गूळ, कढीलिंब, सुक्याम लाल मिरच्या, आमसूल, हळद, तिखट, मीठ भिजवलेले शेंगदाणे. फोडणीसाठी – तूप, जिरे, मोहरी, 3 लवंगा, 2 तुकडे दालचिनी, हिंग, थोडी कोथिंबीर. ढोकळीसाठी – 1 कप कणीक, दोन टेबल स्पून बेसन, चिमूट हळद, मीठ, तिखट घट्ट भिजवावी.
कृती :- वर दिलेलं साहित्य वापरून चविष्ट आमटी तयार करावी. भिजवलेली कणीक मळून पातळ लाटून शंकरपाळे कापावे. उकळत्या आमटीत उकळावं. बाऊलमध्ये घालून वर लिंबाचा रस व तूप घालून द्यावा. वनडिश मिल आहे. चक्कीची भाजी दीड कप कणीक तिखट मीठ हळद, थोडं तूप, पाणी घालून घट्ट भिजवावी. चिमूट बेकिंग पावडर ऐच्छिक आहे. थाळीत थापून 20 मिनिटे वाफवा. पनीरप्रमाणे चौकोनी तुकडे करा. हे तुकडे म्हणजेच चक्की. थोडे तळून घ्यावे. ग्रेव्हीसाठी – थोडं तेल, 2 कांदे बारीक चिरून, 1 चमचा बडीशेप, 3 हिरव्या मिरच्या, थोडं आलं चिरून, 2 टोमॅटो, कांदा मऊ झाल्यावर प्रत्येकी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट व अर्धा कप दही घुसळून घाला. थोडं पाणी घाला व चक्की घालावी. उकळावं. वर कोथिंबीर व लांब चिरलेली हिरवी मिरची घालावी. ही भाजी जिरा राईसबरोबर द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply