साबुत मसूरकी दाल
साहित्य ः एक वाटी मसूर, तीन टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, पंजाबी गरम मसाला, आमचूर, तूप, जिरे, हिंग, आले.
कृती ः कुकरमध्ये एक वाटी मसूर, दोन वाट्या पाणी, टोमॅटो चिरून, हळद व मीठ घालून शिजवा.
मग नंतर जरा ठेचून घ्या व थोडे पाणी घालून उकळायला ठेवा.
मग त्यात तिखट, पंजाबी गरम मसाला व हिंग घाला.
त्यावर तूप-जिऱ्याची कडकडीत फोडणी घाला. वर भरपूर कोथिंबीर घाला.
आल्याचे लांब लांब, बारीक तुकडे करून त्यात घाला.
गरम भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पंजाबी दाल
साहित्य ः अर्धी वाटी चणाडाळ, एक दुधी भोपळा, दोन कांदे किसून, दोन टोमॅटो किसून, कोथिंबीर, पंजाबी गरम मसाला, हळद, तिखट, मीठ अर्धा इंच आले, तेल, मोहरी, जिरे, आमचूर.
कृती ः चणाडाळ, दुधीचे तुकडे, हळद, मीठ घालून हे सर्व कुकरमध्ये शिजवा. नंतर तेलाची फोडणी करा. त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. किसलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता. मग त्यात शिजलेली डाळ, पंजाबी गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, आमचूर घाला. एक उकळी आली, की वरून भरपूर कोथिंबीर व बटर घाला. ही दाल गरम भाताबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
कणसाची आमटी
साहित्य ः एक मोठे कणीस, अर्धी वाटी ओले खोबरे, दोन मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, दोन आमसुले, तूप, जिरे, मोहरी, गोडलिंब, मीठ, अर्धी वाटी अननसाचे तुकडे, हिंग.
कृती ः कणसाचे गोल काप करून वाफवा किंवा कणीस वाफवून मग त्याचे तुकडे करा. खोबरे, मिरच्या व कोथिंबीर हे वाटून घ्या.
कढईत तुपाची जिरे, मोहरी घालून फोडणी करा. त्यात गोडलिंब घाला. ज्या पाण्यात कणीस वाफवले होते, ते पाणी घाला किंवा साधे पाणी घाला. मग त्यात मीठ, आमसूल, अननसाचे तुकडे घाला व उकळवा. गरम भाताबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
चणाडाळ आमटी
साहित्य ः एक वाटी चणाडाळ, दोन चमचे मूगडाळ, अर्धी वाटी ओले खोबरे, पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, एक चमचा किसलेले आले, 2-3 लवंगा, एक-दोन दालचिनीचे तुकडे, एक मसाला वेलची, मीठ, साखर, एक मोठा चमचा लिंबाचा रस, दोन मोठे चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, 5-6 सुक्यान लाल मिरच्या.
कृती ः खोबऱ्याचे काप, चणा डाळ व मूग डाळ एकत्र करून मऊ शिजवून घ्या. तूप तापवा. त्यात जिरे, लवंगा, वेलची, दालचिनी घालून परतवा. मग त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, खोबरे व आले घालून परतून घ्या. मग त्यात शिजलेली डाळ घालून लागेल तसे पाणी घाला. एक-दोन मिनिटे उकळी येऊ द्या. खायला देताना लिंबाचा रस घाला.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
Leave a Reply