साहित्य:- १०० ग्रॅम तांदूळ, २ कप दही, १ आलेचा तुकडा, हिरव्या मिरच्या, १/२ चमचा मीठ, १/४ चमचा मोहरीची डाळ, कोथिंबीर, १ चमचा, नारळाचा कीस, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जिरं, १/४ चमचा मेथी, २ चिमटी हिंग, १ चिमटी हळद, गोड लिंबाचा पाळा, १ चमचा तूप.
कृती:- ६-७ तास अगोदर तांदळाचा भात शिजवून घ्यावा. त्यात दही, आलं, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, कोथिंबीर व नारळाचा कीस टाकावा. तूप गरम करून मोहरी, जिरं, मेथी, गोड लिंब व हिंगाची फोडणी देऊन त्याला भातात घालून कालवावे. जर जास्त थंड पाहिजे असल्यास त्याला थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply