साहित्य:- कणीक १ वाटी, मैदा १ वाटी, आरारूट २ चमचे, दही २ चमचे, तूप तळायला, साखरेचा पाक २ वाटी.
कृती:- मैदा, कणीक व आरारूट एकत्र करून गरम पाण्यात २ चमचे दही घालून भिजवून घ्यावे. हे पीठ कमीत कमी सहा तास भिजवत ठेवावे. नंतर दोन वाट्या साखरेचा पाक तयार करून ठेवावा. त्यात आवडीप्रमाणे केशर किंवा गुलाबजल घालावे. त्यानंतर तूप गरम करून एका पळीने हे तयार पीठ भज्याप्रमाणे तुपात सोडावे. चांगले फुगून वर आल्यावर साखरेच्या पाकात घालावे. बदाम, पिस्त्याने सजवून खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply