साहित्य-
१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते.
कृती-
हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये. त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे. डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे. इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.
डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे. वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.
चटणी- नारळ,भिजलेले शेंगदाणे किंवा चणा डाळ,हिरवी मिरची,आले ,लसूण ,कढीपत्ता, मीठ,साखर, लिंबू रस /आमचूर ,कोथिंबीर दांड्या सह ,आवडत असेल तर पुदिना मिक्सर मध्ये बारीक करा.
Leave a Reply