दही आणि योगर्ट आपल्या सा रख्या सामान्य लोकांसाठी ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच पदार्धाची दोन वेगेवगेळी नावं. पण हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत. हे दोन्ही डेअरी प्रोडक्ट आहेत, म्हणजेच ते दुधाने बनतात. त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते. हे डेअरी प्रोडक्टचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हे दोन्ही दुधात वेगवेगळ्या प्रकारे यीस्ट बनवून तयार केले जातात. दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्यातील पोषकतत्त्वांपर्यंत सर्वच भिन्न आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थही वेगवेगळे आहेत. लोकांना ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असचं वाटत असतं. पण असं मुळीच नाही, हे दोन्ही पदार्थ वेगळे आहेत.
योगर्ट – Yogurt
योगर्ट हा शब्द एक तुर्की शब्द ‘yoğurt’ वरून घेण्यात आला आहे. इंग्रजीत योगर्टला वेगवगळ्या प्रकारे लिहिले जाते.
योगर्ट बनविण्यासाठी गाय, म्हैस, बकरी, उंट, यॉक, मेंढी, घोडी ह्यांच्या दुधाचा वापर केला जातो.
योगर्ट दुधापासून बनलेले एक असे प्रोडक्ट आहे, जे बनविण्यासाठी दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केले जाते. ह्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला ‘योगर्ट कल्चर’ म्हणतात.
जेव्हा ह्या बॅक्टेरियाला दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबते आणि लॅक्टिक अॅसीड तयार होते. ह्या पद्धतीने योगर्ट तयार केले जाते.
लॅक्टिक अॅसिड बनविणाऱ्या ‘योगर्ट कल्चर’ ह्या बॅक्टेरियामुळे योगर्टला आंबटगोड चव येते.
ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्स पासून एलर्जी असते ते देखील योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.
योगर्ट हे घरी बनवणे तेवढे सोप्पे नाही. पण बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे योगर्ट सहज मिळतील.
योगर्ट हे कॅलशियम, रायबोफ्लेविन-विटॅमिन B2, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, आयोडिन, विटॅमिन B-12 आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ह्याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगले असते.
दही – Curd
दही बनविण्यासाठी गाय, म्हैस, बकरी, उंट, मेंढी, रेनडियर, लामा ह्यांच्या दुधाचा वापर केला जातो.
दुसरीकडे दही बनविण्यासाठी दुधात खाण्यात वापरणारे अॅसीडीक सबस्टन्स जसे की, निंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळण्यात येते.
दही हे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. ह्यासाठी थोडसं दही गरम दुधात मिसळवून त्याला ३-४ तासांकरिता ठेवून द्या.
दह्यात योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. पण दह्यात योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
दह्यात विटॅमिन A, E, K असतात. याव्यतिरिक्त दह्यात रायबोफ्लेविन, थायमीन, विटॅमिन B6, फोलेट, विटॅमिन B12, कॅलशियम, आयरन, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक सारखी पोषकद्रव्ये देखील असतात.
दही हे पोटा संबंधी आजारात, त्वचेसाठी, केसांसाठी, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Leave a Reply