साहित्य : एक किलो चिकन, दोन कांदे slice करून, लसूणपाकळ्या 5/6, एक मोठा टोमॅटो चिरून घ्या, एक कांदा बारीक चिरून, लसूण, खोबरे, कोथिंबीर, आले चे वाटण, 4/5 चमचे किसलेले खोबरे, हळद, मीठ, घरगुती मसाला, चिकन मसाला, तेल.
कृती : चिकन धूहून घ्या .त्याला मीठ हळद लावून मॅरीनेट करा .तेल गरम करून दोन कांदे खोबरे लसूण लाल होईल असे परतून घ्या मग त्यात टोमॅटो परतुन घ्या त्याचे वाटण बनवा . तेलगरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्या त्यात चिकन लसूण खोबरे परतून तयार वाटण परतून घ्या त्यात आवडीप्रमाणे मसाले मीठ टाकून झाकण ठेवा .पाणीवापरू नका झाकण ठेऊन छान शिजते चिकन .कोथिंबीरने गार्निश करा.
Leave a Reply