साहित्य: ३०० ग्रॅम दुधी भोपळा, ३ वाट्या कणीक, १ चमचा तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, २ चमचे धणे-जीरे पूड, १ चमचा गरम मसाला, ४ चमचे डालडयाचे मोहन.
कृती: भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.
नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.
जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.
नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.
Leave a Reply