साहित्य : अंडी, कांदा, खोबरं (सुके), आमसूल, मीठ, हळद, तिखट, लसुण, आलं, कोथिंबीर.
कृती : प्रथम अंडी उकडून घेणे. थोडा कांदा, खोबरे, आलं, लसुण भाजून घेणे व त्याचे बारीक वाटण करून घेणे. उरलेला कांदा तेलावर फोडणीला टाकून त्यामध्ये हळद, तिखट टाकून चांगला गुलाबी रंगावर परतणे. नंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालणे व ते परतणे. नंतर पाहिजे त्या प्रमाणात रस्सा करण्यासाठी पाणी घालणे व त्यात मीठ घालून उकळी आणणे. उकडलेल्या अंड्याची साले काढून अंडी अर्धी कापुन त्या रस्स्यात सोडणे. वरून कोथिंबीर बारीक चिरून घालणे. हवे असल्यास दोन आमसुले (कोकम) घालणे.
Leave a Reply