साहित्य –
एक वाटी मैदा,एक वाटी साजूक तुपावर भाजून घेतलेली कणीक, मुटका वळला जाईल इतपत कडकडीत वनस्पती तुपाचे मोहन. चिमुटभर मीठ, अर्धा कप दूध व घट्ट पीठ भिजवायला आवश्यक तेवढे पाणी. पीठ पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट भिजवा व मळून एका बाजूला झाकून ठेवा.
मोदकाच्या आत भरायचे सारण –
चार वाट्या ओल्या नारळाचा चव, आवडीनुसार दोन ते तीन वाट्या किसलेला गूळ किंवा साखर. दोन चमचे भाजलेल्या खसखशीची पूड. (ऐच्छिक) एक कप साईसकट (मलाईचे) दूध, वेलदोडे पूड, चारोळी, बेदाणे,काजू व बदामाचे काप,खारकेची पूड,सारणात घालायला तांदूळाची पिठी इत्यादी.
कृती –
किसेला गूळ / साखर, दूध व ओल्या नारळाचा चव एकत्र शिजवा. शिजवून कोरडं करा. त्यात एक चमचा तांदूळाची पिठी घाला. सारण गार होऊ द्या.
टीप – या सारणात खारकेची पूडही घालतात. पिठाची पारी लाटून वाटीने एकसारख्या पुर्या . कापून घ्या. लाटलेली पुरी हातावर घेऊन तिला द्रोणासारखा आकार देऊन त्यात सारण भरून मोदक तयार करून तळून घ्या.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply