साहित्य:- १ मध्यम केळं, १ लहान सफरचंद, १ मध्यम संत्र, १/२ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, १/२ कप कंडेंन्स मिल्क, १/२ कप दूध.
कृती:- फळांची तयारी
द्राक्षं: द्राक्षांचा आकार लहान असेल तर अख्खी द्राक्षं वापरावी. मोठी द्राक्षं असतील तर प्रत्येकाचे दोन भाग करून घ्यावे.
संत्र: संत्र्याचे साल काढून आतील फोडी विलग कराव्यात. प्रत्येक फोड सोलून घ्यावी आणि आतील गर फक्त वापरावा.
पपई: पपई सोलून आतील बिया फेकून द्याव्यात. पपईचे मध्यम तुकडे करावे.
केळं: केळं सोलून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
सफरचंद: नेहमी सफरचंद शेवटी कापावे म्हणजे काळे पडत नाही. सफरचंदातील बिया काढून टाकाव्यात आणि सफरचंदाचे बारीक किंवा मध्यम तुकडे करावेत.
सर्व फळं एकत्र करावीत. त्यात कंडेंन्स मिल्क आणि साधे दुध घालून मिक्स करावे. (दूध आणि कंडेंन्स मिल्कचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. म्हणून आधी १/४ कप दूध आणि १/४ कप कंडेंन्स मिल्क एकत्र करून फळांमध्ये घालावे. मिक्स करून चव पाहावी. जर गोडपणा बरोबर असेल पण फ्रुट सलाड जास्त घट्ट झाले असेल तर थोडे साधे दुध घालावे.) ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. थोडे बेदाणे, पिस्ता, बदाम सजावटीसाठी ठेवावे फ्रिजमध्ये गार करून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply