साहित्य :- १५० ते २०० ग्राम टोफू, १ गाजर किसलेले, दोन वाटय़ा कणीक (गरजेनुसार कमी-जास्त लागू शकते.), दही, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून, १/२ चमचा धणेजिरे पूड, १/४ चमचा हळद, चवीपुरते मीठ, पराठे भाजण्यासाठी तेल किंवा बटर
कृती :-टोफू हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. परातीत किंवा खोलगट भांडय़ात घेऊन टोफू कुस्करून घ्यावा. त्यात कणीक घालून हलकेच मिक्स करावे. नंतर किसलेले गाजर, मिरच्या, धणे जिरेपूड, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मळावे आणि गरजेप्रमाणे दही घालून पराठय़ासाठी कणीक मळून घ्यावी. खूप घट्ट मळू नये त्यामुळे पराठे कोरडे होऊ शकतात. मळलेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात घेऊन २ ते अडीच इंचाचे समान गोळे बनवावे. कोरडी पीठ लावून पराठे लाटावेत आणि मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावेत. पराठे भाजताना कडेने थोडे तेल किंवा बटर घालावे त्यामुळे खमंग स्वाद येतो आणि पराठे मऊ राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply