आपणा सर्वांना माहितीच आहे की गाजराचे औषधी गुणधर्म आहेत त्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसंच चेहर्यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो तसंच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असमुळे रक्तपित्त तयार होऊ देत नाही. तसं तर गाजर थंड प्रवृत्तीची असते पण हे कफनाशक आहे. गाजरातील लोहतत्व कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला स्वस्थ ठेवतात.
गाजराची भाकरी
साहित्य – एक वाटी ज्वारीचे पीठ , लाल मिरच्यांचे बारीक तुकडे , चवीनुसार मीठ , २ गाजर.
कृती – प्रथम गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्यावेत व त्यातले पाणी बाजूला करुन,गाजरे
कुस्करून घ्या.एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका,
त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमीजास्त लागेल
पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा.
आता वरच्या फॉइलच्या तंत्राने भाकर्या करा. या भाकरीला सुरेख रंग येतो, त्यातले व चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.
Leave a Reply