गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या गवतास क्वचित फूल येतें. गवती चहा हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. सिंगापूर व सिलोन येथें सुवासिक तेल काढण्याकरितां गवती चहा पुष्कळ लावितात. अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. मग त्यात गवती चहाच्या काही पाती मिसळा. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. हा चहा चवीला उत्तम आणि आरोग्याला हितकारी आहे. यामुळे शरीर स्वच्छ होते, अवयवांचे कार्य सुधारते. मात्र लहान मुलांना गवती चहा देण्यापूर्वी अवश्य सल्ला घ्यावा. या गवताचा सुवासिक तेल काढण्याकडेच विशेष उपयोग होतो. ‘कोलन वॉटर’ तयार करण्यांत या तेलाचा फार खप होतो. तापांत घाम येण्यासाठीं गवती चहाचा काढा करून पाजतात. ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. कपभर गवती चहा घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. त्यातील अॅंन्टीबॅक्टेरियल घटक संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करते. गवती चहाचे तेल डोकेदुखीची समस्या कमी करते. किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते. गवती चहामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच सतत मुत्र विसर्जन झाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनही सुधारते. गवती चहातील ‘अॅतन्टीमायक्रोबाईल’ घटक पचनसंस्थेचा मार्ग सुधारण्यास मदत करतो. त्यातील अॅसन्टीसेप्टीक घटक बॅक्टेरियांचा नाश करून बद्धकोष्ठता, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. वाताचा त्रास असलेल्या रुग़्णांनी गवती चहाचे तेल लावणे हितदायी आहे. त्यातील दाहशामक घटक सांधेदुखी कमी करतात. यासाठी गवती चहाचे तेल खोबरेल तेलात मिसळून गुडघ्यांवर लावावे. तसेच गवती चहा पिणेदेखील संधीवाताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. गवती चहामुळे कर्करोगापासून बचाव होतो. त्वचेचा तसेच स्तनांच्या कर्करोगापासून बचावण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. गवती चहा मधील व्हिटामिन ए त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील अॅसन्टीसेप्टिक घटक आणि अॅलस्ट्रिंजंट घटक पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. गवती चहा प्यायल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही स्वच्छ राहण्यास मदत होते. गवती चहाचे तेल नेहमीच्या तेलात मिसळून लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. खरा `ग्रीन टी’ प्यायचा असल्यास, `गवती चहा’ (चहा पत्ती) आणि `पुदिना’ ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या. या गवती चहा पासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात ७० ते ८५ टक्के सिट्रॉल असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
गवती चहाचे तेल कुठे मिळेल?
गवती चहाचे तेल कोठे मिळेल याबाबत माहिती मिळावी ही विनंती आहे