साहित्य:- गव्हाचे पफ २०० ग्रॅम ,डिंक पावडर ५० ग्रॅम ,खारीक पावडर ५० ग्रॅम , ८-१० काजू पाकळी ,८-१० बदाम ,८-१० बेदाणे , दोन वाट्या साजूक तूप ,दोन वाट्या साखर , दोन छोटे चमचे वेलची पूड.
कृती:- गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू,बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या. आता एका पातेल्यात साखरेचा पाक घेऊन त्यात डिंकाची तळून घेतलेली पावडर,खारकेची पावडर,तळलेले काजू व बदाम यांचे काप / तुकडे आणि बेदाणे व वेलची पूड आणि तळून उरलेले तूप घालून मिश्रण झार्याेने ढवळून घ्या.मिश्रण लाडू वळण्याइतके घट्ट होत आले की गॅस बंद करून मिश्रण थोडेसे थंड होऊ द्या. थोडेसे थंड होताच तुपाच्या हाताने लाडू वळून घ्या. लाडू पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply