साहित्य :- 2 कप कणीक, 2 अंडी, पाव चमचा मीठ, पाणी, कॉर्नफ्लोअर इ.
कृती :- कणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, पिठी म्हणून भरपूर कॉर्नफ्लोअर वापरावं. पोळीचा चपटा रोल बनवून कात्रीने नाजूक रिबिनीप्रमाणे पट्ट्या कापाव्या. सुट्या करून पंख्याखाली सुकवाव्या. बाजरी नूडल्सप्रमाणे पाण्यात मीठ, थोडं तेल घालून उकडून गार करून वापराव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply