साहित्य :- एक वाटी मटार, एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, पाव वाटी कोथिंबीर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, सहा उकडलेले बटाटे, तीन चमचे कॉर्नफ्लोअर, लिंबूरस, मीठ, साखर चवीनुसार.
कृती :- कढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत. त्यात किसलेले चीज घाला व पुन्हा थोडेसे परता. गॅस बंद करा. बटाटे उकडून घ्या. त्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा. त्यात मटार-चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply