पेरू शक्य तो सर्वांच्या आवडीचे फळ. पांढरा आणि लाल या दोन रंगामध्ये पेरू असतात. पेरूचे झाड कोठेही उगवून येत असल्याने आपल्या परबागेत एकतरी पेरूचे झाड आपल्याला पहावयास मिळेल. काही जणांना कच्चा पेरू खायला आवडतो तर काहींना अगदी पिकलेला पेरू खायला आवडतो. लाल रंगाचा पेरू सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहे. या पेरूची चव नेहमीच्या पेरू सारखीच असते. परंतु रंगामुळे तो सर्वांना जास्त आवडतो. वैशिष्ट्यपूर्ण वास व गोडसर चवीचा पेरू साऱ्यांना प्रिय आहे. लाल पेरू, कच्चापक्का, खोबऱ्यासारखा पेरू पिकलेला पिवळा पेरू असे पेरूचे वेगवेगळे प्रकार शक्ययतो सगळ्यांनाच आवडतात. पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. पेरू हे “क’ जीवनसत्त्वयुक्त फळ आहे, त्यामुळे हिरड्या बळकट होतात, अन्नपचनास मदत होते व चांगली भूक लागते. जेवणानंतर पेरू खाल्ल्याने पचन सुलभ होते. या फळातील कॅल्शिअममुळे दात व हाडे मजबूत होतात. हे फळ ताजे असताना खाल्ले तर फार चविष्ट लागते. पेरूच्या बाबतीत असे म्हटले जाते few guavas in the season keeps doctor away for the whole year. पेरू मध्ये निऍसिन, फोलेट, पॅन्थॉनिक ऍसिड, बिटा केरोटीन, लायकोपेन, थायमिन आदी घटक आढळतात. याशिवाय लोह, कॅल्शीयम, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक ही खनिज द्रव्येही असतात. पेरू हे जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे व फायबर यांनी परिपूर्ण असे भरीव फळ आहे. त्यात कोलेस्टेरॉल आजिबात नसून कमी प्रमाणात कर्बोदके आहेत. त्यामुळे हे पटकन पोट भरणारे अन्न आहे. पण त्यात सफरचंद, द्राक्षे किंवा इतर फळांपेक्षा खूप कमी साखर आहे. त्यामुळे त्याने खूप वेळ भूकही लागत नाही व वजनही वाढत नाही. पेरूमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे ते चयापचयाची क्रिया नियमित करून अन्नाचे शोषण करण्यास मदत करते. खूप जास्त प्रमाणात असणारे फायबर शरीरातील साखरेचे शोषण नियंत्रित करतात त्यामुळे इन्शुलीन व ग्लुकोज यांचे एकदम वाढणे किंवा एकदम कमी होण्याचे प्रमाण कमी होते. पेरू खाण्याने मधुमेह दोन याची सुरवात होण्याचे प्रमाण खूप कमी होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
काही कृती पेरूच्या
पेरूचं रायतं
पेरूचा जॅम
पेरूचे पंचामृत
पेरूबोट
पेरूची भाजी प्रकार एक
पेरूची भाजी प्रकार दोन
भरले पेरू
पेरूची जेली
पेरूची चटणी
पेरूचा ज्यूस
अमरूद(पेरू) की चटणी
Leave a Reply