गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा… आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी असतील, तर आपला स्वत-चा खाद्यपदार्थाचा डबा उघडताच “चाखों ना थेपला न् अथनु (लोणचं)‘ असं म्हणून त्यांच्या डब्यातील खाऊ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. गुजराती जेवणखाण म्हटलं, की सर्वप्रथम सुरत शहराचं नाव आठवतं. गुजराती लोकांमध्ये तर म्हणच आहे, की “सुरतनू जमण (जेवण) अने काशीनो मरण.
गुजराती लोकांच्या जेवणात एकूणच “फरसाण‘ या प्रकाराला फार महत्त्व आहे. फरसाण म्हणजे आपण बाजारातून आणतो ते शेव, गाठियावालं फरसाण नव्हे, तर फरसाण म्हणजे जेवणातील साईड डिश वा नाश्त्या चे पदार्थ; मग ती कधी मुगाची भजी असतात, कधी मेथीचे गोटे, कधी इदडा, तर कधी खाटा ढोकळा वा पापडी चाट.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही कृती गुजराथी पदार्थांच्या.
ओसामण
इदडा
पोंक वडा (पोंक म्हणजे हुरडा)
पोंक पॅटिस
मुठिया
मेथी ठेपला
Leave a Reply