गुलाबजाम रबडी

साहित्य : पाव किलो ताजा खवा.चार वाट्या चाळलेला मैदा, अर्धा किलो साखर,एक चमचा विलायची पावडर,चिमुटभर केशर , एक किलो रबडी,काजू व बदामाचे काप,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.

कृती : सुरवातीला खवा व मैदा एकत्र मिक्स करून मळून घ्या. त्याचे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून तेलात गुलाबजाम तळून घ्या.

आता गुलाबजामसाठी साखरेचा पाक करण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये साखर व पाणी समप्रमाणात घेऊन उकळायला ठेवा. साखर विरघळेपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर त्यात केशर व विलायची पूड घालून मंद आचेवर ५-७ मिनिटे पाक उकाळून घ्या.पाक उकळत असतांना सतत ढवळत रहा.

आता तळलेले गुलाबजामचे गोळे पाकात १ ते २ तास राहू द्या. त्यानंतर गुलाबजाम पाकातून काढून रबडीमध्ये घाला. काजू व बदामाचे काप घालून गुलाबजाम सजवून घ्या व सर्व्हिंग बाउल्समध्ये काढून सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*