साहित्य:- गव्हाचे पीठ- १ कप, पाव कप- तूप, साखर- १ कप, आटवलेले दूध- १ कप, वेलदोडे- १ टीस्पून, काजू.
कृती:- गॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर पीठ चांगले भाजून घ्या. मग त्यात १ कप साखर घाला. ती चांगली मिसळली गेल्यावर १ कप आटवलेले दूध घाला. वेलदोडे पावडर आणि काजू घाला. चांगले दाट होईपर्यंत शिजवा. गरमगरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply