बेसन-पीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते.
साहित्य:- हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या मिरच्या ,मीठ व साखर, मोहरी, चिमूटभर हिंग,हळद,दोन टेबलस्पून बेसन पीठ.
कृती:- प्रथम भांडे गरम करून त्यात तेल तापवून मोहरी व जिरे, मिरचीची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा. नंतर हिंग, हळद परतवून त्यावर चिरलेली फुले घालून परतवा. ५-१० मिनिटे वाफेवर शिजू द्या मग त्यावर चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, मिठ, घालून व भाजीवर बेसनाचे पीठ भुरभुरून पेरावे व हे पेरत असतांना भाजी सतत झार्यावने हलवत राहावी म्हजे पीठ सगळीकडे सारखे लागेल. बाजीला पेरुन लावलेले बेसनाचे पीठ शिजण्यासाठी भाजीवर एका ताटात पाणी घालून ते तात झाकण म्हणून ठेवा एक वाफ आणून मग गॅस बंद करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply