अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असलेत्या बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात, गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते. हादगा पित्त, वात व कफनाशक असून पौष्टीक व शक्तीवर्धक आहे. हादग्याच्या पानांमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अगस्ता हा शेंगा येणार वृक्ष आहे. तो पुष्कळ वर्ष जगतो आणि जलद वाढतो. देशात खास करून राज्यात अगस्ताची लागवड देवळात, परसात आणि शेताच्या बांधावर केली जाते. अत्यंत औषधी झाड म्हणून अगस्ता ओळखला जातो. हातग्याच्या फुलांची व शेंगाची भाजी करतात जी नेत्रविकारावर तसेच शरिरस्वास्थासाठी गुणकारी ठरते. हादगा ही वनस्पती सर्दी, डोकेदुखी, नेत्रविकार, मिरगी, वायुविकार, पोटदुखी, त्चचाविकार आदींवर गुणकारी ठरते. मात्र हादगा याचे अति सेवन झाल्यास ते पोटाच्या विकारास कारणीभूत ठरते. नवरात्रीच्या उपवसाला हादग्याचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. कबरेदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तंतूंमुळे पोट साफ राहतं. जीवनसत्त्व ‘अ’ शरीरातल्या रक्ताची मात्रा सुधारतात. ‘ब’आणि ‘ड’ जीवनसत्त्वांमुळे अन्नपचनास मदत होऊन वात होत नाही.या झाडाच्या मुख्य दोन जाती आहेत. एक पांढरा आणि दुसरा तांबडा अगस्ता. फुलांच्या रंगांवरून अगस्ताच्या या दोन जाती केलेल्या आहेत. शिवाय निळी आणि पिवळी फुलं असलेलाही अगस्ता असतो. पैकी पांढरा अगस्ता सर्वत्र उपलब्ध असतो. याची पानं साधरण आवळा आणि रत्नगुंज यांच्यासारखी असतात.म्हणजे मध्यम आकाराची पण,दुहेरी आणि पिसासारखी असतात. झाडाला वर्षातून अनेक वेळा फुलं येतात. मात्र खरा फुलांचा बहार असतो, तो ऑगस्ट ते डिसेंबपर्यंत. वर्षातून झाडाला पंधरा ते वीस वेळा फुलं येतात. ती कोयरीच्या आकाराची असून मोठी असतात. अगस्ताच्या शेंगा फूटभर लांब असतात. फुलं आणि कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. अळुवडय़ांच्या पानांच्या ज्या प्रकारे वडय़ा करतात अगदी तशाच अगस्ताच्या फुलांच्या पाकळय़ांच्याही वडय़ा केल्या जातात. अगस्ताच्या फुलांच्या पाकळ्यांची आणि पानांची काही ठिकाणी भजीही केली जाते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी
हादग्याची वडी
हादग्याच्या पानाची भजी
Leave a Reply