साहित्य:- अगस्ताचा कोवळा पाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ, डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल, तीळ आणि गरम मसाला.
कृती:- अगस्ताचा कोवळा पाला धुऊन तो बारीक चिरून घ्यावा. गरम पाण्यात चिंच तीन ते चार तासांसाठी भिजत घालायची. तिचा कोळ काढून घ्यावा. या चिंचेच्या कोळामध्ये गूळ भिजत ठेवावं. कोळामध्ये गूळ चांगलं विरघळवत ठेवावं. कोळ न शिजवता कच्चाच ठेवावा. एकीकडे डाळीचं पीठ भाजून घ्यावं. चिरलेल्या पानांमध्ये अंदाजाने डाळीचं पीठ, तिखट, मीठ, कोळ, गरम मसाला घालून कणिकेप्रमाणे पीठ मळावं. त्यांचा लांबट लोड करून तो उकडवत ठेवावा. दहा मिनिटं उकडल्यावर तो गार करण्यास ठेवावा. पूर्ण गार झाल्यावर त्यांच्या गोल गोल चकत्या करायच्या. आवडत असल्यास या चकत्या तळाव्यात नाही तर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात चकत्या घालाव्या. झारा न लावता त्या टॉस कराव्यात. वरून भाजलेले तीळ भुरभुरावे. अशा प्रकारे अगस्ताच्या फुलांच्या पाकळय़ांच्याही वडय़ा करता येतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply