सॅन्डविच फुल ऑफ हेल्थ

साहित्य : 
५ ब्राऊन ब्रेड चे स्लाईसेझ, १ वाटी तूप, १ वाटी रवा, १/४ वाटी सिमला मिरची चे तुकडे, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी कणसाचे दाणे, १/२ चमचा मिरी पावडर, १/२ चमचा चिली फ्लेक्स, ५ चीज क्युब्ज, चवीनुसार मीठ.

कृती :

एक मोठी वाटी बटर पूर्णपणे फेटून घ्या. आता त्यात रवा आणि इतर भाज्या एकत्र करुन घ्या. आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. आता ब्रेड स्लाइसवर हे मिश्रण लावून घ्या व त्यावर चीज किसून घ्या. आता नॉनस्टिक तव्याला गरम करुन त्यावर तूप घाला आणि ब्रेड चे स्लाइसेस त्यावर ठेवून द्या. आणि मंद आचेवर टोस्ट करुन घ्या. तयार झालेले हेल्दी सॅन्डविच टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*