रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. पण आपण जर ग्रेव्ही घरच्या घरी बनवू शकलो तर हॉटेल सारखे पदार्थ घरी करू शकतो. स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे वाटण जे आज काल ग्रेव्हीज म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या भागात जो पदार्थ पिकतो त्या पदार्थाचा त्या भागातल्या ग्रेव्हीमध्ये वापर केला जातो. टोमॅटो ग्रेव्ही, पालक ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही असे ग्रेव्हीचे चार बेसीक प्रकार आहेत. ग्रेव्ही जर आधीच व्यवस्थित बनवून ठेवल्यास ५ मिनिटांत हॉटेलसारखी भाजी बनवता येते. फ्रिज असल्यास ग्रेव्ही दहा बारा दिवस आधी बनवून ठेवता येतात. मालवणी ग्रेव्हीत सुके खोबरे, ओले खोबरे व धने यांचा वापर जास्त प्रमाणात करतात. नारळाच्या वापरामुळे इतर ग्रेव्हीच्या तुलनेत याची चव वेगळीच लागते. यात मुख्यत: मासे, मटण, अंडी केली जातात, परंतु शाकाहारी लोकांसाठी पनीरचा उपयोग करून एक वेगळ्या चवीचा पदार्थही बनवता येईल. काही ठिकाणी ग्रेव्हीला घट्टपणा आणण्यासाठी काळ्या चण्यांचाही उपयोग करतात. व्हाइट ग्रेव्ही ही कोफ्त्यासाठी उपयुक्त असते. काश्मिरी ग्रेव्हीत मिरची हाच मुख्य भाग असतो. काश्मीरमध्ये अक्रोडचा उपयोग होतो. काश्मीरमध्ये अक्रोड विपुल प्रमाणात होतो, त्यामुळे तिथे गेल्यावर तुम्हाला अक्रोडच्या टरफलापासून तयार झालेल्या वेगवेगळ्या वस्तू व अक्रोडाच्या लाकडाचा वापर बराच दिसतो. बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही ही ग्रेव्ही तशी उत्तर भारतीय. यात व्हिनेगरचा वापर करतात. या ग्रेव्हीत सगळ्यांना प्रिय असे बटर चिकन बनवतात.
तसेच ‘खडा मसाला” म्हणजे विविध प्रकारच्या मसाल्यांच्या घटक पदार्थांचे सुयोग्य मिश्रण त्यामुळे मसाल्यांची ‘नैसर्गिक चव’ व सुगंध कायम रहाते व त्यापासून निर्मित पदार्थ अतिशय चविष्ट व रूचकर बनतात.
ग्रेव्हीचे प्रकार
ड्राय ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही
बेसिक व्हाईटचा उपयोग हा ग्रेव्हीला चकचकीत आणि घट्टपणा आणण्यासाठी होतो. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीत वापरू शकतो. छोले, दमालू, मसाल्याची वांगी, चिकन आणि फिश करी करण्यासाठी ब्राऊन ग्रेव्ही वापरतात.पालक पनीर, आलू पालक आणि पनीर पसंदा करण्यासाठी ग्रीन ग्रेव्ही वापरतात. पनीरच्या भाज्या आणि मलई कोफ्ता करण्यासाठी क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही वापरतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply