साहित्य : ज्वारीचे पीठ १ वाटी (आदल्या रात्री ज्वारी भिजवून दुसऱ्या दिवशी उपसून त्याला मिक्सरमध्ये बारीक करावे. वरची टरफले निघून जातील. उरलेले पीठ ताकात भिजवून ठेवा किंवा ज्वारीचे पीठ घेऊन आदल्या रात्री ताकात भिजवून ठेवा.), सुक्या खोबरे तुकडे ४ चमचे, शेंगदाणे पाव वाटी, हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी १ चमचा.
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून त्यानंतर खोबरं व शेंगदाणे घालून परतावे. त्यानंतर हिंग, हळद व दोन वाटय़ा पाणी घालावे. नंतर भिजवलेले ज्वारीचे पीठ घालून ढवळावे. एक वाफ येऊ द्यावी. नंतर कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply