टोमॅटो सॉस(पिझ्झा व पास्ता साठी)
साहित्य:- ४ लाल टॉमेटो, लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, मीठ.
कृती:- टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत. टॉमेटोची प्युरी करून घ्यावी. एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
टोमॅटो सॉस, व केचप
साहित्य:- (सॉससाठी) ३ किलो टोमॅटो , अर्धा किलो साखर, ५ – ६ लवंगा, ४ – ५ तुकडे दालचिनी, ५ – ६ काळे मिरे, व्हिनिगर, छोटा अर्धा चमचा सोडियम बाय कार्बोनेट, २ चमचे मीठ.
(केचपसाठी )वरील सर्व साहित्यासह आलं लसूण पेस्ट व लाल तिखट.
कृती : सॉससाठी चांगले लाल व कडक असे निवडून टोमॅटो घ्यावेत. म्हणजे सॉसला रंग छान येतो. ते बारीक चिरून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. पोह्याच्या चाळणीतून हाताने दाबत गाळून – गाळून चोथा कोरडा होईपर्यंत गाळून घ्यावे. लवंग, दालचिनी, काळे मिरे मिक्सरवर बारीक पूड करून घ्या. ही पूड एका स्वच्छ पातळ कापडात अगर रूमालात घालून पुरचुंडी करावी. जाड बुडाच्या पातेल्यात टोमॅटोचा रस गॅसवर शिजवत ठेवावा. त्यात ती पुरचुंडी बुडवून ठेवावी. रस आटून घट्ट व्हायला लागतो. एकसारखे ढवळत रहावे. त्यावेळेस एका छोट्या ताटलीत थेंब टाकून बघावा. त्याच्या कडेने पाणी दिसेनासे होईपर्यंत शिजवावे. मग त्यात साखर घालून परत शिजवावे. घट्ट झाल्यावर त्यात २ चमचे मीठ घालून ढवळून खाली उतरवावे. पुरचुंडी दाबून, पिळून काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात टिकाऊपणासाठी व्हिनिगर व छोटा अर्धा चमचा सोडियम बाय कार्बोनेट घालावे. स्टरलाईझ्ड बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.
(केचपसाठी ) सर्व कृती वरीलप्रमाणेच फक्त पुरचुंडीमध्ये वरील पूडसहित आलं लसूण पेस्ट घालावी. व लाल तिखट घालून साखरेचे प्रमाण कमी करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
टॉमेटो सार
साहित्य:- ७-८ लाल टॉमेटो, २ हीरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, कढिपत्ता ५-६ पाने, मीठ, साखर
कृती : सर्व प्रथम टॉमेटो शिजवून घ्यावेत. नंतर त्या उकडलेल्या टॉमेटोची साल काढून घ्यावी., १ मिरची, कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबिर, इंचभर आलं अस ब्लेंडर ने किंवा मिक्सरमधून फिरवून घ्याव. मग हे मिश्रण चाळणीतून किंवा गाळण्याने गाळून चोथा टाकून द्यावा. मग गाळलेला साराचा भाग मंद गॅसवर चवीपुरता मीठ, साखर, उरलेली कोथिंबिर, हवी असल्यास अजून एखादी मिरची घालून उकळून घ्यावे. हे सार जरा गोडसरच चांगल लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply