साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर, आले पेस्ट, कोथिंबीर
कृती : दोन कच्च्या कैऱ्यांची साले काढून बारीक तुकडे करावेत व कुकरमधून वाफवून घ्यावेत. वाफवलेले कैरीचे तुकडे कागदावर पसरावेत. दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता व हिंग यांची फोडणी करून त्यात कैरीचे तुकडे घालून थोडेसे पाणी घालावे. नंतर बारीक गूळ, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा मिरची पावडर, आले पेस्ट घालून ढवळावे. नंतर कोथिंबीर चिरून घालावी.
Leave a Reply