साहित्य – दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, लाल तिखट, पिठी साखर, आमचूर पावडर, तेल, मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पावडर, बडिशेप, गरम मसाला आणि मीठ.
कृती – मैद्यात अर्धी वाटी तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवावा. सारणासाठी कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात डाळीचं पीठ घालून पीठ चांगलं भाजून घ्यावं. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा पिठी साखर, अर्धा चमचा जिरे, धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा अर्धवट कुटलेली बडीशेप घालून मिश्रण जरा परतावं. नंतर त्यावर पाण्याचा हपका मारून मऊसर वाफवावं. सारण गार झाल्यावर त्याच्या लहान पेढ्याप्रमाणे गोळ्या कराव्या. भिजवलेला मैदा चांगला कुटून मळून घ्यावा. त्याच्यादेखील सारणाप्रमाणे गोळ्या कराव्या. त्या हातावर थापून मध्ये खोलगट आकार द्यावा. त्यात सारणाची गोळी ठेवून मैद्याची पारी सर्व बाजूने बंद करावी. हाताने दाबून गोळा चपटा करावा. कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply