आज दिवाळी फराळातील शेवटचा प्रकार कडबोळी व डाएट फराळ
कडबोळी प्रकार एक
साहित्य : तांदळाचं पीठ २ वाटय़ा, हिंग पाव चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, लोणी पाव वाटी, मीठ चवीप्रमाणे, पीठ भिजविण्यासाठी निरसं दूध, तिखट अर्धा चमचा, कलौंजी (कांद्याचं बी) अर्धा चमचा, तळण्यासाठी तेल.
कृती : तांदळाच्या पिठात हिंग, जिरेपूड, तिखट, कलौंजी, मीठ व लोणी घालून हाताने मिसळून घ्या. जरुरीप्रमाणे दूध घालून पीठ घट्ट भिजवा. कडबोळी वळून तेलात तळा.
टीप : चकलीच्या सोऱ्याबरोबर कडबोळ्यासाठीही एक ताटली येते. त्यातून कडबोळी केल्यास आतून छान पोकळ कडबोळी होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कडबोळी प्रकार दोन
साहित्य:- पाव किलो तांदळाचे पीठ, चार-पाच चहाचे चमचे लाल मिरची पूड, अर्धी वाटी दुधाची साय, ५० ग्रॅम लोणी, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप, थोडे दूध.
कृती:- तांदळाच्या पिठात अर्धी पळी उकडते तेल ओतावे. नंतर साय, तिखट, लोणी, मीठ वगैरे घालून पीठ चांगले फेसून दुधात मळून घ्यावे. पोळपाटावर पेढय़ाएवढी गोळी घेऊन त्याची कडबोळी करावी व तेलात किंवा तुपात तळावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सातुच्या पिठाची कडबोळी
साहित्य:-१ वाटीभर सातुचे पिठ, १ टी-स्पून जिरे, १ टी-स्पून ओवा, २ चमचे तेल, चवीपुरते मीठ
कृती:- प्रथम सातुचं पीठ, जिरे आणि ओवा एकत्र करुन घ्यावं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं. नंतर थोडं पाणी घालून घट्ट्सर आणि एकजीव भिजवुन घ्यावं. नंतर एका पॅन मधे एक चमचा तेल घालुन ते संपुर्ण पॅनभर पसरवुन घ्यावं. हवं असल्यास जास्त ही घालू शकता पण एवढं पुरेसं होतं माझ्या अंदाजानुसार. भिजवलेल्या पिठाची कडबोळी वळुन ती पॅनमधे ठेवा. कडबोळ्यांवर १-२ थेंब तेल घाला. आता गॅस वर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवुन एक वाफ येऊद्या. नंतर एकदा सगळी कडबोळी उलटुन पुन्हा एकदा झाकण ठेवुन एक वाफ आणा. हवं असल्यास पुन्हा थोडसं तेल घाला आणि परतुन घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply