साहित्य : 1 kg कैरी, 1/2 kg गुळ, 1 वाटी लसूण पाकळी, 3 चमचे मेथी (छोटे), 1 वाटी तिखट (किव्हा आपल्या आवडी नुसार), 1 चमचा हळद (छोटा चमचा), 1/2 चमचा हिंग (खडा हिंग वापरा), 1 वाटी मीठ, 2 छोटे चमचे , तेल.
कृती : प्रथम कैरीच्या गुळाचे लोणचे आहे तर गुळ छान पाहिजे……जर आपल्याला खात्री असेल की गुळ छान आहे तर या लोणच्यात गुळ न काहीही करता टाकला तरी चालेल…जर गुळा बद्दल शँका असेल तर गुळा चा पाक करून घ्यावा … खूप कडक पाक नको अगदी साधा पाक करून घ्या..जर गुळ छान नसेल तर काही दिवसांनी लोणच्याला फेस व वास येऊ शकतो.. म्हणून….पाक करावा..जर गुळा बद्दल खात्री असेल तर तसाच वापरावा … इती..तर गुळाचा पाक करून ठेवावा ….तसेच कैरी च्या फोडी करून ठेवा…..आवडत असेल तर लसून भरपूर सोलून ठेवा अंदाजे एक मोठी वाटी…(आवडत असेल किव्हा नसेल तरी पण या लोणच्यात एकदा लसूण वापरून पहा…)
लोणच्या साठी जे मीठ घेतले त्याचे तीन भाग करा …..आता एका कढईत 1 चमचे तेल घ्यावे. त्यात 3 चमचे मेथी टाकून लालसर कलर येई पर्यन्त परतवा व मेथी मिक्सर मध्ये टाका व त्यात मिठाचे तीन भाग केले त्या पैकी 1 भाग मीठ टाकून मिक्सर मधून दरदरा काढून ठेवावे…व उरलेल्या तैलात गुळाचा पाक बनवावा…आणि थंड करायला ठेवा….पाक थंड झाल्यावर जरा गुळाचा पाक कडक होईल… तर तसाच लोणच्यात टाकावा….
दुसऱ्या भांड्यात परत 1 चमचा तैल गरम करावे….तेल खूप गरम न करता त्यात आपल्या आवडी नुसार तिखट टाकावे व थोडं अर्धा मिनिट परतवा….मग त्यात हळद, हिंग, व मिठा पैकी 2 रा भाग टाकून छान परतवा…(इथे हा मसाला योग्य रीतीने परतवा ..तिखट वगरे जळू देऊ नका .नाहीतर लोणच्या चा रंग काळपट येईल…तसेच हळद योग्य प्रमाणात टाका ..अति हळद लोणच्या रंग खूप पिवळसर होईल…तर प्रमाण योग्य ठेवा…) हा मसाला थंड करायला ठेवा ….गुळाचा पाक व मसाला थंड झाल्यावर….एका पसरट भांड्यात कैरी च्या फोडी घ्या..त्यात आवडत असेल तर भरपूर …भरपूर म्हणजे भरपूर लसणाच्या पाकळ्या टाका..(20 ते 25 दिवसांनी म्हणजे लोणचं मुरल्यावर या लसना स्वाद ……हाहाहा..)
आता यात थंड झालेला तिखटाचे मिश्रण टाका…व त्यात गुळाचा पाक टाका…(यावेळी तो पाक कडक झाला राहील …घाबरू नये) आता तो मिठा चा 3 रा व शेवटचा भाग ..(हे शेवट चे जे मीठ आहे ते सर्व भांड्याना पुसून टाकावे म्हणजे जे आपण लोणच्या साठी भांडे वापरले त्याच तैल वगरे या मिठा ला लागून जाते आणि भांडे पण स्वच्छ ..!) त्या लोणच्याच्या मिश्रणात टाका व छान मिक्स करून ठेवावे… 2 ते 3 तासाने या गुळाच्या लोणच्याला रस्सा सुटणे सुरू होईल.. आणि 10 तासा नंतर हे लोणचे काचेच्या बरणीत भरून थंड जागेत ठेवा…आणि एक दिवसा आड या लोणच्याला खालीवर करत रहा 15 दिवस ….एकदा का लोणचे सेट झाले तर वर्षभर मग पाहू नका !!
तर असे हे कैरी गुळाचे लोणचे अगदी सोपे…चवीला तर विचारू च नका…आणि मुख्य यात असलेला “लसूण” या लोणच्याला वेगळाच स्वाद देतो..कोणत्याही पदार्थां सोबत …अप्रतिम प्रवासात तर…लय भारी… आमच्या लहानपणी घट्ट वरण, त्यावर कांदा बारीक चिरलेला आणि त्यावर हे गुळाचे लोणचे वरतून थोडं तेल… हा उन्हाळ्यातील मेनू….
दत्तप्रसंना विचोरे
नागपूर
9665053874
Leave a Reply