साहित्य:- अर्धा किलो मैदा, ४ टेबलस्पून तूप, पाणी, तेल, अर्धा कप खोवलेला नारळ, १ कप रवा, १ कप साखर, १ टीस्पून वेलदोडे पावडर, १५ काजू तुकडे केलेले, ५-६ बदाम, तुकडे केलेले.
कृती : मैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply